सचिनला भारतरत्नचा मार्ग मोकळा - Marathi News 24taas.com

सचिनला भारतरत्नचा मार्ग मोकळा

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
भारतीयांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.
 
पंतप्रधान कार्यालयानं नियमांमध्ये बदल केल्यानं क्रिकेटपटू सचिनला लवकरच भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळू शकतो. गृह आणि क्रीडा खात्याच्या शिफारशीनुसार नियमांमध्ये बदल करण्यात आलाय. सचिनबरोबरच ख्यातनाम हॉकीपटू ध्यानचंद यांनाही भारतरत्न मिळण्याची शक्यता आहे.
खेळाडूंना भारतरत्न देण्याचा नियम नसल्यानं आतापर्यंत सचिनला भारतरत्न मिळणार अशी केवळ चर्चाच होती. आता पात्रता नियमात बदल केल्यानं क्रीडा क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणा-यांना देण्यात येणार असल्याची नव्यानं तरतूद करण्यात आलीय.

First Published: Friday, December 16, 2011, 03:06


comments powered by Disqus