अद्वितीय... 'ऑइल्स ऑफ वंडर' - Marathi News 24taas.com

अद्वितीय... 'ऑइल्स ऑफ वंडर'

www.24taas.com, लंडन
२०४ देशांचा सहभाग... १० हजार अॅथलिट्स... २६ खेळ... ३०२ क्रीडाप्रकार आणि एक नाव... अर्थातच ऑलिम्पिक.
 
क्रीडा जगताच्या महामेळ्याला अर्थातच लंडन ऑलिम्पिकला आजपासून सुरुवात झालीय.  हा सोहळा केवळ लंडनसाठीच नाही तर अवघ्या जगासाठी महत्त्वाचा आधुनिक ऑलिम्पिकचे जनक असलेल्या ‘पिअरी डी कुबर्टिन’ यांच्या वाक्याप्रमाणे ‘या खेळात सहभाग हेच जिंकण असतं.’ अशा या खेळाच्या महाकुंभाला आता सुरुवात झालीय.
 
लंडनच्या ऑलिम्पिक पार्कवर शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजता एक अविस्मरणिय अनोखा असा  सोहळ्याला सुरुवात झाली. लंडन ऑलिम्पिक २०१२... या  ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी ही इंग्लंडसारखीच... खरं पाहता या संपूर्ण सोहळ्यात फक्त आणि फक्त इंग्लंडचीच छाप होती.  थेम्स नदीच्या प्रवासातून ऑलिम्पिक पार्कवर एक वेगळच विश्व साकारण्यात आलं होत. यातून सफर घडली ती वेळेची ज्याला ‘टाईम ट्रॅव्हल’ म्हणतात ती... इंग्लंड शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभं राहण्यापूर्वीचा इतिहास यातून जगासमोर आणण्यात आला. ग्रामीण इंग्लंडचं शांत सुदंर रुप... त्यानंतर झालेली औद्यागिक क्रांती आणि या औद्यागिकीकरणामुळे इंग्लंडने जगाला जी गती प्राप्त करुन दिली त्याचं आश्चर्यचकीत करणारं चित्र पार्कवर उभं राहिलं. या औद्योगिकिकरणाच्या देखाव्यातूनच निघला वितळलेला धातू.  त्याला रिंगचं रुप देण्यात आलं होतं. हिच रिंग विश्वास न बसण्यासारखी आकाशात जाऊन दुसऱ्या रिंगबरोबर जोडली गेली आणि त्यातून तयार झालं ऑलिम्पिकचं चिन्ह. एकमेकांत अडकलेल्या या पाच रिंग म्हणजे जगातील विविध खंडाचे रुप. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या दृश्याला कोणीही विसरु शकणार नाही.
 
अद्वितीय अशा या सोहळ्यात थोडं थ्रिलही गरजेच होतं. जगातील सर्वात मोठा गुप्तहेर अशी ख्याती असलेल्या जेम्स बॉण्डने अर्थात डॅनियल क्रेगनं ब्रिटनच्या राणीला घेऊन चक्क हेलिकॅप्टरमधूनच उडी घेतली. पाहणाऱ्यानं श्वास रोखून पहावं, असंच हे दृश्यं... त्यानंतर एकेकाळी अर्ध्या जगावर फडकलेला युनियन जॅक फडकला आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॅक रोके यांनी ब्रिटनच्या महाराणीचं स्वागत केलं. ‘टूर द फ्रान्स’ विजेता ब्रॅडली विगिन्सनं ऐतिहासिक घंटा वाजवल्यावर ऑलिम्पिक खेळांची सुरूवात झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. ‘ऑइल्स ऑफ वंडर’ असं नाव असलेल्या या दिमाखदार सोहळ्याचं निर्देशन ऑस्कर विजेता डॅनी बॉयल यानं केलं.  विक्रमी तिसऱ्यांदा ऑलिम्पिक आयोजनाचा मान इंग्लंडला मिळाला आणि तो का? याच उत्तर हा सोहळा पाहिल्यावर मिळालं. बीजिंगपेक्षा अर्ध्या खर्चात केलेल्या या महासोहळ्याची आठवण कधीच विसरली जाणार नाही.
 
व्हिडिओ पाहण्यासाठी :
 

.
.
 

First Published: Saturday, July 28, 2012, 08:08


comments powered by Disqus