Last Updated: Saturday, July 28, 2012, 20:33
www.24taas.com, लंडन ऑलिम्पीक सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दलात एक अज्ञात महिला आढळून आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाने या बाबतची तक्रार आयोजन समितीला केलेली आहे. भारतीय ऑलिम्पीक संघाने ‘झी 24 तास’ला भारतीय दलात एक अज्ञात महिला असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
भारतीय दलात अज्ञात महिला आसल्याने भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहीला आहे.ही सर्व माहिती आय़ओए चे कार्यवाहक अध्यक्ष वी.के.मल्होत्रा यांनी दिली.
लाल शर्टआणि निळीपँट परिधान केलेली एक अज्ञात महिला बीजिंग गेम्समधील ब्राँझ पदक विजेता सुशील कुमार याच्या शेजारी चालत होती. संचलनामध्ये अगदी पुढे असणाऱ्या या महिलेला पाहून भारतीय गोंधळात पडले होते.
First Published: Saturday, July 28, 2012, 20:33