शाहिद आफ्रिदी पुन्हा पाक संघात - Marathi News 24taas.com

शाहिद आफ्रिदी पुन्हा पाक संघात

झी २४ तास वेब टीम, लाहोर 
 
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी शाहिद आफ्रिदी या निवडीमुळे सज्ज झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी आफ्रिदीसह अब्दुल रझ्झाकचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी इजाज बट्ट यांच्याजागी झाका अशरफ यांची निवड झाल्यानंतर आफ्रिदीने आपण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. बट्ट यांच्याशी वाद झाल्यानंतर आफ्रिदीने मे महिन्यात पाकिस्तानचे कर्णधारपद सोडले होते आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णयही घेतला होता.

First Published: Thursday, November 3, 2011, 10:16


comments powered by Disqus