प्रीतीने घेतली आर. अश्विनची विकेट - Marathi News 24taas.com

प्रीतीने घेतली आर. अश्विनची विकेट

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
भारताचा फिरकीपटू आर. अश्विन वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
 
अश्विन आपली लहानपणीची मैत्रीण प्रीती नारायणन हिच्याशी १३ नोव्हेंबरला लग्न करणार आहे. या दोघांचा साखरपुडा यावर्षीच आयपीएल दरम्यान झाला होता. पदार्पणाच्या कसोटीतच सामन्याचा मानकरी किताब मिळाल्याने खूश असलेल्या अश्विनने पहिल्या कसोटीतील चांगल्या प्रदर्शनानंतर मी आता लग्न करण्यास तयार झाल्याचे म्हटले आहे.
 
अश्विनच्या लग्नाचे मोजक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले असून, कसोटी मालिका सुरु असल्याने भारतीय संघातील खेळाडू त्याच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.  आर. अश्विनने  वेस्टइंडीजविरुद्धच्या  पहिल्या कसोटी सामन्यात नऊ बळी मिळवीत सामन्याचा मानकरी किताब मिळविला आहे.

First Published: Thursday, November 10, 2011, 06:52


comments powered by Disqus