Last Updated: Thursday, November 10, 2011, 11:15
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
आर. अश्विन आणि प्रग्ज्ञान ओझा यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केलेल्या कामगिरीमुळे ऑफस्पिनर हरभजनचे भारतीय संघातील पुनरागमन लांबले आहे . दुसर् या कसोटी सामन्यासाठी हरभजनची निवड करण्यात आलेली नाही.
भारतीय संघाचा नियमित सदस्य असलेला हरभजन याची कामगिरी दिवसेंदिवस खराब झाल्याने संघाबाहेर गेला. त्याच्याजागी आर. अश्विन आणि प्रग्ज्ञान ओझा यांना संधी मिळाली त्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ उठविला . अश्विनने तर पहिल्या कसोटीत सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकाविला .
ओझाने सामन्यात चांगली कामगिरी केलीय. अश्विन तर सामन्यात सर्वोत्तमही ठरला आहे, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी यांने सांगितले. त्यामुळे हरभजनच्या पुनरागमनासंदर्भात निर्णय होणे कठीण असल्याने संकेत मिळाले होते. त्याप्रमाणे दुसर् या कसोटी सामन्यासाठी हरभजनची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे हरभजनला मैदानाबाहेर राहावं लागलं आहे.
First Published: Thursday, November 10, 2011, 11:15