सचिनच्या महासेंच्युरीचं भाकीत - Marathi News 24taas.com

सचिनच्या महासेंच्युरीचं भाकीत

झी २४ तास वेब टीम, कोलकाता
 
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी टेस्ट आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगतेय. सचिन ईडनवरच विक्रमी महासेंच्युरी पूर्ण करेल, असं भाकीत क्रिकेट पंडितांनी वर्तवलंय.
 
वेस्टइंडिडच्या बॉलर्सना ईडन गार्डन्सवर द्रविडपासून जितका धोका वाटतोय त्याहून अधिक धोका आहे तो सचिन तेंडुलकरचा. कोटला टेस्टमध्ये ७५ रन्स करून महासेंच्युरी पूर्ण करण्यासाठी सचिन स्वत: किती उत्सुक आहे. याचीच प्रचिती आली होती. त्यामुळे आनेक क्रिकेट पंडितांनीही सचिन ईडनवरच विक्रमी महासेंच्युरी पूर्ण करेल असं भाकीत वर्तवलंय.

First Published: Monday, November 14, 2011, 08:37


comments powered by Disqus