सचिनच्या प्रेमात विंडिजचा किर्क एडवर्ड्स - Marathi News 24taas.com

सचिनच्या प्रेमात विंडिजचा किर्क एडवर्ड्स

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे जगभरातील क्रिकेटपटूंची प्रेरणा. सचिनवर वेस्ट इंडिजच्या किर्क एडवर्ड्सनेस्तुतिसुमने उधळून आपणही त्याचे निस्सीम चाहते असल्याची ग्वाही वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
जेव्हा सचिन फलंदाजीसाठी क्रीझवर असतो, तेव्हा क्षेत्ररक्षण करतानाही माझे भान हरपून जाते, अशी प्रतिक्रिया एडवर्ड्सने व्यक्त केली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला मंगळवारपासून मुंबईत वानखेडे स्टेडियम प्रारंभ होत आहे.
राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस.लक्ष्मणप्रमाणे अनेक भारतीय क्रिकेटपटूंचा मला आदर आहे. परंतु सचिनसोबतच्या सामन्यात खेळणे, हा माझ्यासाठी खास अनुभव ठरला. या स्मृती माझ्या मनात चिरंतर राहतील, असे एडवर्ड्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर सांगितले.

First Published: Monday, November 21, 2011, 04:39


comments powered by Disqus