Last Updated: Tuesday, November 22, 2011, 10:22
झी २४ तास वेब टीम, मुंबई भारत आणि वेस्ट इंडिज तिसरा कसोटी सामना वानखेड़े स्टेडियम सुरु आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ताजा वृत्तानुसार वेस्ट इंडिजने लंचपर्यंत विना विकेट ८० रन्स केल्या.
वेस्ट इंडिजचा शिव नारायण चन्द्रपॉल आजच्या सामन्यात खेळत नाही. तर भारताकडून दोन बदल करण्यात आले आहे. युवा खेळाडू वरुण ऐरॉन आणि विराट कोहली यांना संधी देण्यात आली आहे.
भारताने २-० ने कसोटी सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. वानखेड़े स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिन महाशतक ठोकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
First Published: Tuesday, November 22, 2011, 10:22