कसोटी क्रमवारीत भारत दुसऱया स्थानी - Marathi News 24taas.com

कसोटी क्रमवारीत भारत दुसऱया स्थानी

झी २४ तास वेब टीम, दुबई
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताने दुसरे स्थान पटकाविले आहे.
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिका बरोबरीत सोडविल्याचा फायदा भारताला झाला आहे.  त्यामुळे कसोटी क्रमवारीमध्ये भारताने दुसरे स्थान पटकाविले आहे.
 
दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३१० धावांचा पाठलाग करून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविल्याने दक्षिण आफ्रिकेचे १११६ गुण झाले आहेत. भारताचे ११७ गुण आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताकडे २-० अशी आघाडी आहे.
 
जुलै महिन्यामध्ये झालेल्या इंग्लंडदौऱ्या आधी भारतीय संघ कसोटीत अव्वल स्थानी होता. मात्र, या मालिकेमध्ये ०-४ असा पराभव स्वीकारावा लागल्याने इंग्लंडने १२५ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले होते. ऑस्ट्रेलिया १०५ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर श्रीलंका (९९) त्यानंतर पाकिस्तान (९८) आहे.

First Published: Wednesday, November 23, 2011, 06:49


comments powered by Disqus