मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय - Marathi News 24taas.com

मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय

www.24taas.com, कोलकाता
 
कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्‍याने 20 षटकांमध्‍ये 4 बाद 155 धावा काढल्‍या. मुंबईच्‍या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.
कोलकात्‍याच्‍या डावाची सुरुवात खराब झाली. मुनाफ पटेलने मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्‍याच षटकात मुनाफने गौतम गंभीरला शून्य धावांवर क्लीन बोल्ड केलं.तर दुस-या षटकात प्रग्‍यान ओझाने मनविंदर बिस्‍लाचा बाद केले. त्‍यानंतर जॅक कॅलिसने डाव सावरला. मनोज तिवारीसोबत त्‍याने अर्धशतकी भागीदारी केली. तिवारी 27 धावा काढून बाद झाला. त्‍यानंतर युसुफ पठाणच्‍या साथीने धावगती वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला. कॅलिसने अर्धशतक ठोकून एक बाजू लावून धरली. परंतु, अपेक्षेप्रमाणे फटकेबाजी करता आली नाही. कॅलिस आणि युसुफ पठाण या जोडीने 9 च्‍या सरासरीने धावा काढल्‍या. परंतु, तोपर्यंत आवश्‍यक धावगती बरीच जास्‍त झाली होती. कॅलिस अखेरच्‍या षटकात 60 चेंडुंमध्‍ये 79 धावा काढून बाद झाला. पठाण 31 चेंडुंमध्‍ये 40 धावा काढून बाद झाला.
 
सचिनने अवघ्‍या 2 धावा काढल्‍या. त्‍यानंतर कोलकात्‍याच्‍या गोलंदाजांना एकही विकेट मिळविता आली नाही. रोहित शर्मा आणि हर्शेल गिब्‍स जोडीने आक्रमक भागीदारी करुन मुंबईचा डाव सावरला.  रोहितने 29 चेंडुंमध्‍ये 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्‍यानंतर हर्शेल गिब्‍जनेही अर्धशतक पूर्ण केले. रजत भाटीयाच्‍या एका षटकात त्‍याने 4 चौकार आणि एक षटकार ठोकला. हर्शेल गिब्‍जने 58 चेंडुंमध्‍ये नाबाद 66 धावा काढून रोहितला मोलाची साथ दिली. दोघांनी नाबाद 167 धावांची भागीदारी केली होती.

First Published: Saturday, May 12, 2012, 20:22


comments powered by Disqus