Under-19 World Cup: India beat Pakistan, 24taas.com

अंडर १९ वर्ल्डकप : भारताची पाकिस्तानवर मात

अंडर १९ वर्ल्डकप : भारताची पाकिस्तानवर मात
www.24taas.com, टाऊन्सविले
‘अंडर नाईन्टीन वर्ल्डकप’मध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

‘अंडर १९ वर्ल्डकप’च्या अटीतटीच्या लढतीत भारताने पाकिस्तानला एका विकेट्नं पराभूत केलंय. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगला उतरलेल्या पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३७ रन्सचं आव्हान ठेवल होतं. भारतानं हे आव्हान नऊ विकेट्स गमावत ४८व्या ओव्हरमध्ये पार केलं आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताकडून बाबा अपराजितने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. तर विजय झोलने ३६ रन्स केल्या. तत्पूर्वी भारताकडून संदीप शर्मा आणि रविकांत सिंग यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत पाकिस्तानची इनिंग ४६ व्या ओव्हरमध्येच १३६ रन्सवरच ऑल आऊट केली. संदीप शर्मा आणि हरमीत सिंगनं १० रन्सची निर्णायक पार्टनरशिप केली.

First Published: Monday, August 20, 2012, 13:04


comments powered by Disqus