Last Updated: Friday, September 28, 2012, 22:28
www.24taas.com, कोलंबो भारताने दिलेल्या 141 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार प्रहार करत भारताची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. पहिल्या सुपर ८ च्या लढतील भारतावर नऊ गडी राखून विजय मिळविला.
ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन आणि वॉर्नरने तुफान फटकाबाजी करत १५ व्या षटकात सामना खिशात घातला. वॉटसनने ७२ आणि वॉर्नर ६३ धावांची शानदार खेळी केली. भारताकडून युवराज सिंगला केवळ एक विकेट पदरात पाडता आली.
भारताची बलाढ्य फलंदाजी आज पुन्हा ढेपाळली. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभाण्यात यश आले नाही. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 141 धावांचे माफक आव्हान दिले आहे.
पॉवर प्लेच्या 6 षटकांमध्ये भारताने 1 बाद 50 अशी मजल मारली होती. परंतु, भारताच्या धावगतीला ब्रेक लागला आहे. भारतचा तिसरा फलंदाज बाद झाला आहे. युवराज सिंग 8 धावा काढून बाद झाला.
आक्रमक सुरुवातीनंतर भारताला पहिला धक्का बसला.
भारताने टॉस जिंकून पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवातीनंतर मात्र गंभीरच्या आळशीपणाचा त्याला फटका बसला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली. भारताला पहिला धक्का बसला. सलामीवीर गौतम गंभीर १७ रन काढून तो रनआऊट झाला. कमिन्सच्या बॉलिंगवर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
भारताच्या सुपर- ८ मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत पहिलाच सामना आहे. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज वीरेंद्र सेहवागला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. वीरेंद्र सेहवागला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
हा मोठा निर्णय असून याशिवाय अशोक दिंडा आणि लक्ष्मीपती बालाजीला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर झहीर खान आणि आर. अश्विनला संघात घेण्यात आले आहे.
First Published: Friday, September 28, 2012, 20:00