क्रिकेटर ख्रिस गेलच्या रूममधून तीन महिलांना अटक , Gayle`s female guests arrested in West Indies rooms

क्रिकेटर ख्रिस गेलच्या रूममधून तीन महिलांना अटक

क्रिकेटर ख्रिस गेलच्या रूममधून तीन महिलांना अटक
www.24taas.com, कोलंबो

श्रीलंकेच्या पोलिसांनी तीन ब्रिटीश महिलांना वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याच्या रूममधून अटक केलेलं आहे. या मुली ख्रिस गेलच्या रूममध्ये नक्की काय करत होत्या, त्या ख्रिस गेलच्या रूममध्ये गेल्याच कशा? त्यांचा नक्की काय हेतू होता? ख्रिस गेलने त्यांना तिथे बोलावलं होतं की, त्या रूममध्ये स्वत:हून आल्या होत्या. यासारखे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

मात्र सुत्रांच्या माहितीनुसार समजते आहे की, ह्या महिला ख्रिस गेलच्या पाहुण्या होत्या. आणि त्यानेच त्या तिघींनाही बोलावलं होतं, मात्र त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून अटक केली. मात्र त्या तिन्ही तरूणींना जामीनावर सोडण्यात आलं आहे.

ख्रिस गेलने त्याच्या टीम मधील इतर खेळाडू म्हणजे, आंद्रे रसेल, फिडेल एडवडर्स आणि डेव्हेन स्मिथ यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या मते जर का, त्या पाहु्ण्या असतील तर त्यात कोणतीही चुकीची गोष्ट नाही.

First Published: Wednesday, October 3, 2012, 17:48


comments powered by Disqus