Last Updated: Saturday, September 22, 2012, 12:34
www.24taas.com, कोलंबोइंग्लंडने अफगाणिस्तानचा ११६ धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचं टी-२०विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने २० ओव्हर्समध्ये ५ बाद १९६ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये ल्यूक राइटने ५५ बॉल्समध्ये तडाखेबाज नाबाद ९९ धावा कुटल्या. त्याने आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले.
इंग्लंडचं १९७ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली अफगाण टीम फक्त ८० धावांपर्यंतच मजल मारू शकली.
First Published: Saturday, September 22, 2012, 12:29