Last Updated: Sunday, September 30, 2012, 18:59
www.24taas.com, कोलंबो टी २० वर्ल्डकपच्या युद्धात आज कोलंबोमध्ये ऑस्ट्रलिया आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये समोरासमोर उभी ठाकली. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय.
तब्बल ८ विकेट राखत ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पछाडलंय. डेव्हिड वार्नर ५ रन्स देऊन बाद झाला. मात्र, शेन वॅटसननं ७० रन्स, मायकल हसीनं नाबाद ४५ तर कॅमरॉन व्हाईटनं नाबाद २१ रन्सची खेळी करत ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून दिला.
पहिल्यांदा बॅटींगचं आव्हान पेलणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं ५ विकेट गमावत १४७ रन्सचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलंय. याअगोदर, सुपर-८च्या ग्रुप २ मधल्या या युद्धात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत एक पाऊल पुढे टाकलंय. पहिल्यांदा बॅटींगसाठी दक्षिण आफ्रिकेला संधी देत ऑस्ट्रेलियानं बॉलिंगचा निर्णय घेतला.
या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं बाजी मारल्यानं त्यांचा सेमीफानलमध्ये जाण्याचा मार्ग पक्का झालाय. आणि अगदी याच्या उलट दक्षिण आफ्रिकेची स्थिती आहे. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागल्यानं त्यांना सेमीफायनलमधूनच बाहेर पडावं लागलंय.
ऑस्ट्रेलियानं सुपर-८च्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये भारताला ९ विकेटसनं पराभवाचा जबरदस्त धक्का दिला होता. तर दक्षिण आफ्रिकेला सुपर-८च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
First Published: Sunday, September 30, 2012, 16:34