वेस्ट इंडिज x आयर्लंड : सामना रद्द; वेस्ट इंडिज `सुपर-८`मध्ये, Match abandoned as West Indies move to Super Eights

वेस्ट इंडिज x आयर्लंड : सामना रद्द; वेस्ट इंडिज `सुपर-८`मध्ये

वेस्ट इंडिज x आयर्लंड : सामना रद्द; वेस्ट इंडिज `सुपर-८`मध्ये
www.24taas.com, कोलंबो
वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दरम्यान सोमवारी प्रेमदासा स्टेडियम खेळली गेलेली टी-२० मॅच आज रद्द करण्यात आली. ‘ग्रुप बी’ हा अंतिम सामना होता. आयर्लंडच्या बॅटींगनंतर पावसामुळे खेळ अशक्य असल्यानं ही मॅच रद्द केली गेली. आत्तापर्यंतच्या पॉईंटसनुसार वेस्ट इंडिजचा समावेश ‘सुपर ८’मध्ये करण्यात आलाय. साहजिकच, आयर्लंडचा टी-२०मधला प्रवास मात्र इथेच संपला.

आयर्लंडनं १९ ओव्हर्समध्ये ६ विकेट १२९ रन्स केले होते. पावसामुळे ही मॅच १९ ओव्हर्समध्येच थांबवण्यात आली होती. त्यानंतर पाऊस सुरूच राहिल्यामुळे अखेर ही मॅच रद्द करावी लागली. टी २० वर्ल्डकपमध्ये रद्द करण्यात आलेली ही पहिलीच मॅच ठरली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, २०१० मध्ये इग्लंडनं कोणतीही मॅच जिंकल्याशिवाय सुपर-८मध्ये स्थान पक्क केलं होतं आणि वर्ल्डकपही जिंकला होता. आता सुपर-८ मध्ये वेस्ट इंडिजचा सामना २७ सप्टेंबर रोजी पाल्लेकेलेमध्य इंग्लंडविरोधात रंगेल.

First Published: Tuesday, September 25, 2012, 00:09


comments powered by Disqus