Last Updated: Sunday, September 30, 2012, 07:34
www.24taas.com, कोलंबोटी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ऑफ डेथमध्ये एशियन जायंट्स भारत आणि पाकिस्तानमध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला आज रंगणार आहे. एशियन बिग डॅडीजमधील हा मुकाबला क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणारए. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेसची वाट दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींप्रमाणेच जगभरातील क्रिकेट चाहतेही बघत असतात. प्रॅक्टिस मॅचमध्ये या दोन्ही टीम्समधील मॅचचा ट्रेलर बघितल्यानंतर आता रिअल फिल्म चाहत्यांना सुपर एटच्या मुकाबल्य़ात पाहायला मिळणारए.
प्रॅक्टिस मॅचमध्ये भारताला पाककडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच या पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी माही अँडी कंपनी आतूर असणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाकडूनही दारुण पराभव सहन करावा लागल्यानंतर टूर्नामेंटमधील आपलं आव्हान कायम राखण्यासाठी धोनी ब्रिगेडला ही मॅच जिंकाविच लागणार आहे. कांगारुंविरुद्धच्या मॅचेसमधील चुकांमधून धडा घेत भारतीय टीमला या मॅचेसमध्ये विजयासाठी प्रयत्न करावे लगाणार आहेत. कॅप्टन धोनीच्या चुकीच्या निर्णयाचा भारतीय टीमला कांगारुंविरुद्धच्या मॅचमध्ये बसला होता.
त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध योग्य रणनिती आखून भारतीय टीमला मैदानात उतराव लागणार आहे. 2009 टी-20 चॅम्पियन पाक टीम सध्या तुफान फॉर्मात आहे. त्यांच्याकडेही संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे पाकची विजयी मालिका रोखण्यासाठी माही सेनेला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. आता, टी-20 च्या रणांगणात वर्ल्ड कपच्या इतिहासाप्रमाणे भारतीय टीम पाकवर भारी पडते की, पाकची टीम इतिहास बदलण्यात यशस्वी ठरते ? याकडेच दोन्ही टीम्सच्या चाहत्यांच लक्ष असणारए....
First Published: Sunday, September 30, 2012, 07:27