Last Updated: Friday, September 28, 2012, 19:49
www.24taas.com, कोलंबो भारताच्या सुपर- ८ मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत पहिलाच सामना आहे. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज वीरेंद्र सेहवागला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात 2 बदल करण्यात आले आहेत. वीरेंद्र सेहवागला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
हा मोठा निर्णय असून याशिवाय अशोक दिंडा आणि लक्ष्मीपती बालाजीला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर झहीर खान आणि आर. अश्विनला संघात घेण्यात आले आहे.
First Published: Friday, September 28, 2012, 19:42