वर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय, sex with Cricket player in Sri Lanka

वर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय

वर्ल्डकप दरम्यान खेळाडूंना सेक्ससाठी सुरू होतं वेश्यालय
www.24taas.com, कोलंबो

आयसीसी टी-20 विश्वमचषकादरम्यान विंडीज फलंदाज ख्रिस गेलच्या खोलीत रंगलेल्या पार्टीमुळे नवा वाद समोर आला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या गार्ड्संनी गेलच्या खोलीतील तीन मुलींना अटक केली. या घटनेबरोबरच काही दिवसांपूर्वी घडलेला आणखी एक किस्सा उजेडात आला. ऑस्ट्रेलियन टीम राहत असलेल्या हॉटेल सिनेमन ग्रँडमध्येस एका व्यक्तीने खेळाडूंकडे जाऊन सेक्सचा प्रस्ताव ठेवला होता.

या दोन घटनांमुळे क्रिकेटच्या पाठीमागे सुरू असलेल्या या खेळावर प्रकाशझोत पडला आहे. श्रीलंका पोलिसांनी कोलंबोच्या माऊंट लाविनिया येथील टेंपल रस्या असलवर छापा मारला होता. छाप्यादरम्यान एका अजब वेश्यालयाचे प्रकरण बाहेर आले होते.

हे वेश्यालय गेल्या १० वर्षांपासून फक्त क्रिकेटपटूंना आपली सेवा देत होते. एका पोलिसाने क्रिकेटपटू बनून हे प्रकरण उजेडात आणले होते. पोलिसांनी या वेश्यातलयातून ८ युवती आणि ७८ वर्षीय मालिकिणीला अटक केली होती.

First Published: Thursday, October 4, 2012, 19:26


comments powered by Disqus