आफ्रिकेकडून लंकेचा ३२ धावांनी पराभव, South Africa top group C after win over Sri Lanka

आफ्रिकेकडून लंकेचा ३२ धावांनी पराभव

आफ्रिकेकडून लंकेचा ३२ धावांनी पराभव
www.24taas.com, हम्बनटोटा

टी-२० विश्वचषकाच्या ग्रुप सीच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान श्रीलंकेचा ३२ धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे प्रत्येकी सात षटकांच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, श्रीलंका सात षटकांत पाच गडी गमावून ४६ धावाच काढू शकली.


श्रीलंकेकडून कुमार संघकारा आणि दिलशान मुनाविरा यांनी सर्वाधिक १३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेन याने दोन तर जॅक कॅलिस आणि अल्बी मॉर्केल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


सुरूवातीला पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून डिव्हिलिअर्सने १३ चेंडूत ३० धावा केल्या. त्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. श्रीलंकेला आफ्रिकेचे चार गडी बाद करण्यात यश आले. कुलशेखरा, मलिंगा, हेराथ आणि परेराने प्रत्येकी एक विकेट घेतली.

First Published: Saturday, September 22, 2012, 20:34


comments powered by Disqus