Last Updated: Wednesday, September 19, 2012, 21:53
www.24taas.com, कोलंबो टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांना लढत देत आहेत. कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ही मॅच रंगतेय. यावेळी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅचमध्ये पहिल्यांदा मैदानावर बॅटींगसाठी उतरलेल्या भारतीय संघानं प्रतिस्पर्ध्यांसमोर १६० धावांचं आव्हान ठेवलंय.
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अ गटामध्ये होत असलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार धोनीनं निर्धारीत २० ओव्हर्सच्या शेवटच्या बॉलवर सिक्स मारला. यावेळी भारतानं ५ आऊट १५९ रन्स केले. गौतम गंभीरनं १० रन्स, सेहवागनं ८ रन्स तर युवराज सिंग १८ रन्स काढून बाद झाले. सुरेश रैनानं ३८ रन्स तर कोहलीनं ५० रन्स दिले. धोनी आणि रोहित शर्मा नॉटआऊट राहिले.
आज टीम इंडियामध्ये हरभजनला वगळून एल. बालाजीला संघात स्थान मिळालंय.
First Published: Wednesday, September 19, 2012, 21:53