जयवर्धनेचा `जय` विंडीजचा झाला `पराजय`, west indies against sri lanka in t20 world cup

जयवर्धनेचा `जय` विंडीजचा झाला `पराजय`

जयवर्धनेचा `जय` विंडीजचा झाला `पराजय`
www.24taas.com, पलक्‍कले

टी-20 वर्ल्डकप स्‍पर्धेत यमजान श्रीलंकेने विंडीजवर ९ विकेट्सने धडाकेबाज विजय मिळविला आहे. महेला जयवर्धेनेने नाबाद ६५ तर कुमार संगकाराने नाबाद ३९ धावांची खेळी केली. तिलकरत्‍ने दिलशान १३ धावा काढून बाद झाला. परंतु, जयवर्धेने आणि संगकारा या श्रीलंकेच्‍या सर्वात अनुभवी जोडीने शतकी भागीदारी करुन सहज विजय साकारला.

गेल, पोलार्डला लंकेने रोखले. श्रीलंकेने वेस्‍ट इंडिजच्‍या धडाकेबाज फलंदजांना अवघ्‍या 129 धावांमध्‍ये रोखले. विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, स्‍फोटक फलंदाज ख्रिस गेल अपयशी ठरला.

त्‍यामुळे विंडीजला अपेक्षित सलामी मिळू शकली नाही. त्‍यानंतर लंकेच्‍या फिरकीपटुंनी विंडीजच्‍या फलंदाजांना वेसण घातले.
ख्रिस गेल अवघ्‍या 2 धावा काढून बाद झाला. तर त्‍याचा सलामीचा सहकारी चार्ल्स 12 धावा काढुन तंबूत परतला.


First Published: Saturday, September 29, 2012, 22:52


comments powered by Disqus