Last Updated: Monday, March 17, 2014, 19:18
ट्वेन्टी २० वर्ल्डकपला बांगला देशात सुरूवात झाली आहे. टीम इंडियाही बांगला देशात पोहोचली आहे, आणि सामन्याची तयारी सुरू केली आहे.
या दरम्यान टी २० वर्ल्डकपच्या ट्वीटर अकाऊंटवर युवराज सिंह आणि विराट कोहली यांची सिग्नेचर असलेला एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
या माध्यमातून टी २० वर्ल्डकपला प्रमोट करण्यात आलं आहे. या फोटोत विराट कोहली आणि युवराज सिंह आपल्या अनोख्या अंदाजात दिसत आहेत.
युवराजच्या फोटोसह खाली सिग्नेचर असून खाली #YOUWECAN लिहण्यात आलं आहे. तसेच विराटच्या फोटोवर #Belief लिहण्यात आलं आहे.
टीम इंडिया २००७च्या टी २० वर्ल्डकपची विजेती टीम आहे. मागील वेळेस ग्रुप बी मधून टीम इंडिया बाहेर झाली होती.
युवी आणि विराटच्या फोटोवर लोकांनी खुप सारे ट्वीट केले आहेत. काही लोकांनी टीमचं कौतुक केलं आहे, तर काहींनी टीमचं प्रदर्शन सुधारण्यावर जोर द्या, असा सल्ला दिला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Monday, March 17, 2014, 19:17