Last Updated: Thursday, February 21, 2013, 12:27
www.24taas.com, नवी दिल्ली स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी ‘ब्लॅकबेरी’ येत्या २५ फेब्रुवारीला भारतात एकच धमाका उडवून देणार आहे. एकाच दिवशी ब्लॅकबेरी आपल्या ताफ्यातील १० नवे स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.
ब्लॅकबेरीचे ‘झेड १०’ आणि ‘क्यू १०’ नव्या ‘ब्लॅकबेरी १०’वर आधारीत आहेत. ३० जानेवारी रोजी `ब्लॅकबेरी १०` भारतात लॉन्च करण्यात आलं होतं. ‘कॅनडा’स्थित या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमादरम्यान हे नवीन १० स्मार्टफोन लॉन्च करण्यात येतील. या फोनच्या किंमती सध्यातरी गुलदस्त्यात आहेत.
‘झेड १०’ आणि ‘क्यू १०’ हे स्मार्टफोन मार्केटमध्ये अॅप्पलच्या आयफोनला टक्कर देणार आहेत. बरोबरच याला दोन हात करावे लागतील ते, गुगल अॅन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित इतर स्माईफोनशी.
First Published: Thursday, February 21, 2013, 12:27