Last Updated: Monday, October 7, 2013, 18:36
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीविवाह पोर्टलवर वधू किंवा वर शोधण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच वर्षीच्या जानेवारीपासून ते जुलैपर्यंत विवाहासाठी नावनोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
आयएएमएआय आणि आयएआरबीद्वारे केल्या गेलेल्या इंटरनेट इकोनॉमी वॉच डेटानुसार विवाह पोर्टलवर वधूसंशोधन करणाऱ्यांची संख्या जानेवारीपासून मोठ्या प्रमाणावर वाढत गेली आहे. जानेवारी ते जुलैमध्ये हे प्रमाण १२४ टक्क्यांनी वाढलं आहे. जानेवारीत वधुसंशोधन करणाऱ्यांची संख्या ८.५० लाख एवढी होती. तर जुलैमध्ये ही संख्या १९.१० लाख एवढी झाली.
भारतीय इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशनसाठी ही बातमी निश्चितच चांगली ठरणार आहे. डिजिटल क्षेत्रावर वाढता विश्वास यानिमित्ताने दिसून येत आहे. या सर्वेक्षणासाठी भारतातील २८ नामांकित विवाह पोर्टल्सचा वापर केला गेला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 18:36