Last Updated: Thursday, March 20, 2014, 13:04
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीस्मार्टफोनचा बाप. सर्वांना चकित करणारा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरा आहे. मात्र, हा फोन चीनी असून ओप्पो कंपनीचा आहे.
सध्या बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सीचा एस-५चा १६ मेगापिक्सल ऑटोफॉकस कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. याला टक्कर देण्यासाठी नोकियाने ४१ मेगापिक्सल कॅमेरा फोन लुमिया १०२० आणला.
या फोनला कोणीही टक्कर दिली नव्हती. आता चीनी कंपनी ओप्पोने नोकियाला टक्कल दिली आहे. हा फोन नाही तर स्मार्टफोन आहे. त्यामुळे बाजारात हा स्मार्टफोन धूम माजवणार, हे नक्की.
बीजिंगमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय. `फाईंड-७ ` असे या फोनचे नाव आहे. हा फोन १९ मार्चला मार्केटमध्ये दाखल झाला आहे. स्क्रिन ५.५ इंच, रिझोल्युशन २५६०X१४४० पिक्सेल , १६ जीबी स्टोरेज मेमरी. या फोनची विक्री एप्रिल महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 12:56