Last Updated: Monday, December 23, 2013, 10:32
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाताआयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सायन्सला मदत करणारं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केलं सून त्यामुळं त्वचेच्या कॅन्सरचं निदान करणं सोपं होणार आहे.
क्लिओकॅम-डर्मा असं या अॅप्लिकेशनचं नवा आहे. कानपूर आयआयटीच्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी हे विकसित केलंय. हे पोर्टेबल आणि स्वस्त तंत्रज्ञान असून हे सॉफ्टवेअर वापरुन प्रशिक्षित आरोग्यसेवक त्वचेच्या कॅन्सरचं झटपट निदान करुन शकतील, असं देबदूत शील यांनी सांगितलं.
या तंत्रात मोबाईलला एक क्लीप ऑन डिव्हाईस जॉईंट केलाय. त्याच्या रंगीत फ्लॅशद्वारे त्वचेच्या प्रतिमा मोबाईलद्वारे घेण्यात येऊन त्याद्वारे त्वचेचं पृथक्करण करण्यात येतं. या शोधास बंगळुरु इथं जीई एडीसन चॅलेंज २०१३ हा दहा लाखांचा पुरस्कार मिळालाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 23, 2013, 10:32