एका मोबाईल नंबरसाठी मोजले १३ करोड रुपये!, a mobile number sold in rs 13 crore

एका मोबाईल नंबरसाठी मोजले १३ करोड रुपये!

एका मोबाईल नंबरसाठी मोजले १३ करोड रुपये!

www.24taas.com, झी मीडिया, अबुधाबी

गाड्यांपासून ते मोबाईल नंबरपर्यंत... अनेकांना आपला नंबरमध्ये काहीतरी खास असावा... इतरांहून आपला नंबर वेगळा असावा, अशी इच्छा असते. मग, इतर देशांप्रमाणे भारतातही या व्हीआयपी नंबरसाठी लिलाव सुरू झाला. आत्तापर्यंत हा लिलाव गाड्यांपुरता मर्यादित होता... पण, आता मोबाईल नंबरसाठीही लिलाव सुरू झालाय.

एका व्हीआयपीनंबरसाठी एखादा किती पैसे मोजू शकतो? तर, त्याचं उत्तर आहे अमर्यादीत... कारण, अशीच एक घटना घडलीय अबुधाबीमध्ये... एका मोबाईल नंबरसाठी एकानं चक्क १३ करोड रुपये मोजलेत.

अबुधाबीमध्ये धर्मार्थ लिलावात ७७७-७७७७ हा व्हीआयपी नंबर ७८,७७,७७७ दिरहम म्हणजेच जवळजवळ १३.१२ करोड रुपयांत विकत घेतलं गेलंय. नॅशनल न्यूजपेपरनं दिलेल्या माहितीनुसार, इस्टर्न फोन कंपनी एतिसालातच्या या फोन नंबरसोबतच फोन कंपनीनं एक बंपर पॅकेजही दिलंय.

यानुसार, खरेदीदाराला कंपनीकडून दोन वर्षांचं `डायमंड प्लस पॅकेज`ही मिळणार आहे. या पॅकेजमध्ये २२,५०० फोन मिनिटे, २२,५०० टेक्स्ट मॅसेज आणि १०० जीबी डाटा प्रत्येक महिन्याला फ्री मिळणार आहे. म्हणजेच या नंबरवरून दररोज १२ तास कॉल, ७२५ टेक्स्ट मॅसेज पाठवले जाऊ शकतात. एतिसालातच्या वेबसाईटवर सामान्य व्हीआयपी पॅकेज जवळजवळ १४,०७३ रुपये प्रति महिना आहे.

पण, या सौद्यातही एक पेच आहे. एव्हढा महागडा नंबर विकत घेऊनदेखील या अज्ञात खरीदेदाराला या नंबरचा हक्क मात्र मिळणार नाहीय.... कारण, तांत्रिक पद्धतीनं पाहिलं तर सगळेच नंबरवर सरकारचा हक्क आहे.

या नंबरशिवाय आणखी एक नंबर ७७७-७७७० हा नंबर जवळजवळ २.८ करोड रुपयांना विकला गेलाय. परंतु, अनेक खरेदीदारांनी या लिलावापासून दूर राहणंच पसंत केलं. कारण, फोन नियामक मंडळानं काही दिवसांपूर्वीच व्हीआयपी नंबर बदलले जाऊ शकतात किंवा कंपनी परत घेऊ शकते, असं जाहीर केलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 08:38


comments powered by Disqus