लवकरच येतोय फेसबुकचा नवा लूक a streamlined look for Facebook pages

लवकरच येतोय फेसबुकचा नवा लूक

लवकरच येतोय फेसबुकचा नवा लूक
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

फेसबुकप्रेमींना लवकरच नवीन लुकमध्ये फेसबुक प्रोफाईल आणि फॅन पेज बघायला मिळणार आहे. या नवीन लुकमधून यूजर्सला हवी असलेली माहिती शोधता येईल.

तसेच अॅडमीन युजर्स सतत वापरत असलेले टुल्स सुद्धा सहज शोधून देईल. मात्र फेसबुकचा हा नवीन लुक फक्त डेस्कटॉपसाठीचं असून, मोबाईलमधील अॅप्समध्ये कोणताही बदल केला नाही.

फेसबुकच्या या नव्या लुकमधील फरक म्हणजे युजर्सचा पोस्ट टाईमलाइनच्या उजव्या बाजूला एकाच कॉलममध्ये दिसतील.

युझर्सला फेसबुकच्या उजव्या बाजूच्या कॉलममध्ये सर्व पोस्ट एका खाली एक सलग बातम्या दिसतील तर डाव्या बाजूच्या कॉलममध्ये बिजनेस, फोन नंबर, वेबसाइट यूआरएल, मॅप, फोटो आणि व्हिडिओ दिसतील.

युजर्स कोणत्याही पेजवर असताना त्यांना फेसबुकवरील जाहिरात, नवीन लाईक्स, नोटीफिकेशन आणि मॅसेज पाहता येऊ शकतील.

फेसबुक पेज अॅडमिनसाठी `पेजेस टू वॉच` नावाचं अजून एक नवीन फिचर्स आणणार आहे. या फिचर्समुळे अॅडमिनला स्वत:च्या पेजची तुलना दुसऱ्याच्या पेजबरोबर करता येऊ शकेल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 15, 2014, 13:17


comments powered by Disqus