Last Updated: Thursday, December 13, 2012, 16:13
www.24taas.com, नवी दिल्लीआकाश टॅब्लेटने साऱ्यावरच मोहिनी घातली आहे. आकाश टॅब्लेट आता तुम्हांला आणखी स्वस्तात मिळणार आहे. आकाश टॅब्लेटची वाढती मागणी आणि प्रतिसाद पाहता. याची किंमतही कमी करण्यात आली आहे. जगातील सर्वात स्वस्त आकाश टॅब्लेट आणखी स्वस्त होणार असल्याची माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे.
यापूर्वी सुमारे 2660 रुपयांना मिळणारा आकाश टॅब्लेट आता सुमारे 1900 रुपयांना मिळणार आहे. दूरसंचार साहित्य आणि सेवांची निर्यात परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना सिब्बल म्हणाले, आकाश टॅब्लेट आता लवकरच 35 डॉलर्समध्ये (1900 रु.) उपलब्ध होणार आहे.
यात कोणत्याही अत्याधुनिक टॅब्लेटमध्ये असलेल्या सर्व सुविधा आकाशमध्येही असतील. आकाशच्या नव्या व्हर्शनमध्ये स्काइप अॅपही असेल. सिम कार्ड नसले तरीही इंटरनेट कनेक्शन असल्यास व्हाइस कॉल्स करणे शक्य होईल.
First Published: Thursday, December 13, 2012, 16:09