Last Updated: Monday, February 24, 2014, 17:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमोबाईल वर्ल्ड काँग्रेसला बार्सिलोनामध्ये सुरूवात झाली आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २४ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
यात सॅमसंग, मायक्रोमॅक्स, सोनी, एलजी सारख्या कंपन्या आपले नवे फोन, टॅबलेट लॉन्च करणार आहेत.
सॅमसंगने गॅलेक्सी गियर २ आणि गॅलेक्सी गियर २ निओ स्मार्टवॉच लॉन्च केली आहे.
सॅमसंगचा सर्वात आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी s5 अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, हा फोन या इव्हेन्टमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
हा फोन लॉन्चिंग आधीच लोकप्रिय झाला आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन इंटरनेटवर अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.
मात्र लिक झालेले फीचर्स खरोखर गॅलेक्सी s5मध्ये असतील का?, या बाबतीत सॅमसंगने अधिकृतणे कोणताही दुजोरा दिलेला नाही.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या फोनची स्क्रीन ५.५ इंच आहे, तसेच 2560*1440 पिक्सेलचं स्क्रीन रेझोल्युशन आहे.
जर असं असेल तर सॅमसंग गॅलेक्सी s5ची स्क्रीन आतापपर्यंतच्या फूल एचडी मोबाईल फोनपेक्षा जास्त पिक्चर क्वालिटी देईल.
सॅमसंग गॅलेक्सी s5 स्क्रीन खूपच शानदार असेल, याची डेन्सिटी 560 पिक्सेल असेल, गॅलेक्सी s5 मध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल.
फ्रंट पावर कॅमेरा किती मेगापिक्सेलचा असेल याबाबत अजन काहीही माहिती मिळालेली नाही. या फोनची बॉडी पॉलिकार्बोनेटची नाही तर मेटलची असेल.
सॅमसंग s5 बद्दलजी माहिती अजून लिक होऊ शकलेली नाही, ती सॅमसंग s5 च्या प्रोसेसरबद्दल, ऍपलच्या 64 बिट चिपशी टक्कर घेण्यासाठी चिप बनवण्याचं सॅमसंगने म्हटलं होतं. पण लिक झालेल्या बेंचमार्क टेस्ट रिपोर्टनुसार या फोनमध्ये 2.4 GhZचं स्नॅपड्रॅगन प्रोससर असू शकतं.
सॅमसंग s5 कडून अपेक्षा केली जात आहे की, या फोनमध्ये 330 GPU एड्रीनो ग्राफिक कार्डही असू शकतं. गॅलेक्सी नोट ३ च्या जागी, या फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे.
फिंगरप्रिंट स्कॅनिंग फीचर या फोनमध्ये असेल का?, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 24, 2014, 17:27