व्हाट्स अॅपला टक्कर देणार चॅटऑन,Actress Nargis Fakhri pose during the launch of ChatON in New Delhi

`व्हॉट्स अॅप`ला टक्कर देणार `चॅटऑन`

`व्हॉट्स अॅप`ला टक्कर देणार `चॅटऑन`
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

स्मार्टफोनचा वापर सध्या जोरात आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक नवनविन अॅप्स असणे आज गरजेचे झाले आहे. सध्या व्हाट्स अॅपची जोरदार चलती आहे. त्यामुळे व्हाट्स अॅप खरेदीसाठी फेसबुकने मजल मारली. व्हाट्स अॅपबरोबरच लाईन, बीबीएम, वीचॅट आदीही अॅप्स आहेत. आता यात नव्याने चॅटऑनची भर पडली आहे.

सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनधारकांसाठी चॅटऑन हे अॅप्स लाँच केले आहे. त्यामुळे नव्याने आणखी अॅप्सची भर पडली आहे. नवी दिल्लीत आज चॅटऑन लाँच केले. अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि सॅमसंगचे दक्षिण आशियाई मीडिया सोल्युशन सेंटरचे तरुण मलिक यांच्या प्रमुख उपस्थित हे अॅप्स लाँच केले.

सॅमसंगचे 3.5 व्हर्जन अॅड्रॉईड, आयओएस, विंडोज आणि ब्लॅकबेरी यावर उलब्ध असणार आहे. त्यामुळे हे अॅप्स व्हाट्सअॅपला टक्कर देणार का, याची उत्सुकता आहे. अॅप्सला 1 जीबी पर्यंत फाईल शेरिंग करणे शक्य होईल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर करणे शक्य आहे. या अॅप्सवर 1001 सदस्यांचा ग्रुप करणे सहज शक्य आहे. तसेच लोकेशन शेअरिंगची सुविधाही आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 16, 2014, 16:32


comments powered by Disqus