कार तुमची, ईएमआय आमचा, Ad Company Will Pay Your Car Emi

कार तुमची, ईएमआय आमचा

कार तुमची, ईएमआय आमचा
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

आता या महागाईच्या जमान्यात बिनधास्त कार खरेदी करा. काय म्हणताय? ईएमआयची चिंता? देन डोण्ट वरी. कारण आता तीन वर्षे तुमचा ईएमआय भरणार कंपनी.तुम्ही फक्त कारच्या प्रवासाचा आनंद घ्या.

भारतात पहिल्यांदा एक जाहिरात कंपनी अशी अनोखी योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या कारवर जाहिराती लावल्या जातील आणि त्यानंतर तुमच्या कारचा तीन वर्षाचा ईएमआय ही जाहिरात कंपनी भरेल. परंतु कारचे हप्ते पाच वर्षे कालावधीतच असले पाहिजे. ही अनोखी योजना साकारणाऱ्या कंपनीचे नाव आहे ‘ड्रीमर्स मिडीया अँड अँड्हर्टायजिंग’. सध्या तरी फक्त ही योजना ६ लाखापर्यंतच्या छोट्या कार आणि सिडानवरच उपलब्ध आहे. साधारण पहिल्या वर्षी कंपनी १५० करोड रुपयांचा व्यवसाय करेल अशी कंपनीला आशा वाटते.

ड्रीमर्स मिडीया अँड अँड्हर्टायजिंग चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिस मोहम्मद यांनी अशी माहिती दिलीय की, ह्या योजनेत सध्या आम्ही फक्त ६ लाखपर्यंतच्या कारचा समावेश केला आहे. या योजनेत ग्राहकाला कारच्या कीमतीच्या २५ टक्के रक्कम डाऊन पेमेंटच्या रुपात द्यावी लागेल. त्यांतर पुढचे तीन हप्ते आम्ही देऊ. या वर्षी साधारण १५,०० आणि पुढ्च्या वर्षी १लाख वाहनांना या योजनेत सामील करुन घेण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केलीय.


जाहिरातीसाठी आम्ही बऱ्याच कंपन्यांशी चर्चा करतोय. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही योजना आम्हाला नक्कीच फायदा मिळवून देईल. याव्यतिरिक्त आम्ही ऑटो कंपन्यांशीही चर्चा करतोय, या आकर्षक योजनेमुळे कारविक्रीही निश्चितच वाढेल. ही योजना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. कंपनीचा पसारा वाढावा म्हणून आम्ही सार्वजनिक, खाजगी बँका तसेच विमा कंपन्यांशीही चर्चा करण्यास सुरुवात केलीय. योजनेच्या काही अटी अंतर्गत ग्राहकांना कार १५०० किलोमीटर प्रत्येक महिन्याला चालवावीच लागेल. तसेच कारचीही खूप काळजी घ्यावी लागणार. जाहिरातीचे स्टीकर, वीटीएस खराब होऊ नये याची ही विशेष काळजी घ्यावी लागणार. अशी अधिक माहिती सुनिस यांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 18:22


comments powered by Disqus