Last Updated: Tuesday, February 26, 2013, 21:26
www.24taas.com, मुंबईशिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत असल्याने आता याप्रश्नी युवा सेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट घेणार आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याबाबत आज पत्रकार परीषदेत याची माहिती दिली.
राज्यभरात शिक्षकांच्या विविध संघटनांनी परीक्षा आणि पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. मात्र, या सगळ्यात विद्यार्थ्यांचं काही बरं वाईट झालं तर याला कोण जबाबदार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवाय, सरकारी अधिकारी ढोबळे यांच्यावर बिना चौकशी कारवाई झाली, त्याप्रमाणे शिक्षणमंत्री दर्डा आणि शिक्षण मंडळाचे संचालक सर्जेराव जाधव यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही युवा सेनेने उपस्थित केलाय.
First Published: Tuesday, February 26, 2013, 21:26