Last Updated: Wednesday, May 14, 2014, 19:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मोटोरोलाचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. केवळ एका दिवसात या फोननं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. त्याचं एक कारण म्हणजे ‘मोटो ई’मध्ये असणारं मोटोरोला ‘अलर्ट अॅप’.
मोटोरोला कंपनीनं हे अॅप लॉन्च केलंय. याच्या मदतीनं तुम्ही कठिण प्रसंगी तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना माहिती कळवू शकता. सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या सिक्युरिटी अॅपसारखंच हे अॅप्लिकेशन काम करतं.
‘अलर्ट अॅप लोकेशन अपडेट’ आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्ह केलेल्या काही महत्त्त्वाच्या कॉन्टक्टसनं आपली माहिती कळवतो. जेव्हाही तुम्ही या अॅपचं इमर्जन्सी मोड ऑन कराल, या अॅपमधून तुमच्या महत्त्वाच्या कॉन्टक्टसना मॅसेज पाठवला जाईल. तुमच्या अडीअडचणीच्यावेळी किंवा सुरक्षेसाठी तातडीनं मदत मिळावी यासाठी याचा वापर केला जातो.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 19:11