सावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!Alert - Don`t use smartphone after 9 PM, said research

सावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!

सावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्मार्टफोनचा वापर करणारे व्हा सावधान... एका नव्या अभ्यासानुसार रात्री ९ वाजल्यानंतर स्मार्टफोनवर जास्त वापर करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेत आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तसंच त्याच्या नोकरीतील परफॉर्मन्सवर पण वाईट परिणाम होतो.

वॉशिंग्टन विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासानुसार जर कोणीही रात्री स्मार्टफोनवर लागलेला असेल, तर त्याच्या सकाळवर सरळ-सरळ परिणाम होतो. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये प्रकाशित रिसर्च पेपरच्या मते हे खरंय की स्मार्टफोन लोकांना अपडेट ठेवण्यात उपयुक्त ठरतात. मात्र यासाठी योग्य वेळेची निवड करणं गरजेचं आहे. जर आपण रात्री उशीरापर्यंत फोनच्या स्क्रीनवर काम करत असाल, तर कधी आरामासाठी त्यावर डोळे ठेवून नुसते बघत जरी असाल तर दुसऱ्या दिवशी चिडचिड आणि थकवा जाणवेल.

रात्री उशीरापर्यंत स्मार्टफोनचा वापर झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम करतो. जर झोप चांगली झाली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तणाव जाणवतो. अभ्यासकर्त्यांच्या मते स्मार्टफोन आपल्या मेंदूला खूप कामाला लावतो. जर रात्री उशीरापर्यंत त्याचा वापर केला गेला. तर शांत झोप लागत नाही, आराम होत नाही. त्यामुळं शरीराची बॅटरी कमीच चार्ज होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 19:47


comments powered by Disqus