जाहिरात ऐका... मोफत कॉल करा! allows you to make free calls even without internet

जाहिरात ऐका... मोफत कॉल करा!

जाहिरात ऐका... मोफत कॉल करा!

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

मोबाईलवर केवळ जाहिरात ऐकून फुकट बोलता आलं तर! विश्वासचं बसत नाही ना... मात्र, हे खरं आहे लवकरच बंगळुरुमधील चार इंजिनीअर्स `मोफत कॉल` ही सुविधा मोबाईल धारकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.

आत्तापर्यंत मोफत बोलण्याची सुविधा `स्काईप`मध्ये उपलब्ध होती. पण आता मात्र, मोफत कॉल योजनेत एकच जाहिरात फक्त दोन मिनिट ऐकायची आणि मग कोणाताही व्यक्तीशी आपल्याला तासन् तास फुकट बोलता येऊ शकतं.

भारतात इंटरनेट युजर्सची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या योजनेत ‘अॅड अँन्ड क्लाउड टेलिफोनी` तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय. संगणकाला इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण मोबाईल आणि लँडलाईन फोन जोडून आपल्याला मोफत कॉल सेवेचा वापर करता येईल.

या सेवेचा उपभोग घेण्यासाठी कंपनीच्या `मोफत कॉल’ नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर सर्व्हरवरुन ब्लँक कॉल येईल आणि मग आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे त्यांचा नंबर डायल करावा.

कंपनीने प्राथमिक चाचणीसाठी पाच दिवसांत तब्बल सहा लाख कॉल केलेत. कंपनीला १८५ कोटी रुपयांचा फायदा पहिल्या वर्षी होईल आणि हे उत्पन्न केवळं जाहिरातींमधून मिळणार असल्याचा विश्वास कंपनीनं व्यक्त केलाय.

अद्याप ही सेवा सुरू करण्यात आली नसून येत्या महिनाभरात उपभोक्त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 14:24


comments powered by Disqus