अॅन्ड्रॉईड फोन वापरताय... सावधान!, android phone users alert

अॅन्ड्रॉईड फोन वापरताय... सावधान!

अॅन्ड्रॉईड फोन वापरताय... सावधान!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अॅन्ड्रॉईड फोन युजर्सना धोक्याचा इशारा दिला जातोय. अँन्ड्रॉईड फोन्सचा वाढता वापर पाहता आता त्यांच्यातील असुरक्षिततेच प्रमाणदेखील वाढत चाललंय. आता एक असा व्हायरस तयार झाला आहे ज्यामुळे हॅकर्सना एखाद्याचा फोन हायजॅक करणे तसेच फोनचा डेटा चोरी करणे सहज शक्य होणार आहे. इतकंच नव्हे तर २००९ मध्ये एक असा व्हायरस होता ज्यामुळे हॅकर्स लोकांच्या फोनवरील बोलणसुद्धा ऐकू शकत होते. याव्यतिरिक्त या व्हायरसमुळे एखाद्या यूजर्सच्या फोनवरुन दुसऱ्याला जंक मेल तसेच एसएमएसेससुद्धा पाठवणं सहज शक्य होतं.

अॅन्ड्रॉईड फोन आणि टॅबलेटध्ये असलेल्या `मास्टर की`मुळे फोनच्या डेटापर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. त्यामुळे २००९ पासून सुरु झालेल्या या हॅकर्स डिवाईसमुळे आता जवळजवळ ९० करोड लोकांच्या फोनमधील पर्सनल डेटावर टांगती तलवार आली आहे. ब्लूबॉक्स नावाच्या फर्मच्या ब्लॉगवर जेफ फोरिस्टलने एक पोस्ट लिहिले ज्यामध्ये अॅन्ड्रॉईड फोनपर्यंत कसे पोहचू शकाल आणि त्यामुळे कशाप्रकारे गडबड केली जाऊ शकते याबद्दल सागितले आहे. या वायरसमुळे हॅकर्स फोनमधील सर्व फंक्शंन्सवर कंट्रोल करु शकतात.

फोरिस्टलच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीमध्येच गुगलला या प्रकाराबद्दल सांगण्यात आलंय. या डिव्हाईसमुळे होणाऱ्या समस्यांबद्दल लवकरच सगळ्यांना विस्ताराने माहिती दिली जाईल. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या तरी अॅन्ड्रॉईड फोन या समस्येपासून वंचित आहेत. पण, भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून गुगलने लवकरात लवकर यावर मार्ग शोधावा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, July 7, 2013, 15:31


comments powered by Disqus