Last Updated: Saturday, August 25, 2012, 16:40
www.24taas.com, वॉशिंग्टनपक्षांचा थवा आणि डुक्करांचा कळप आता नासाच्या मंगळावारीचा वेध घेणार आहेत. हे सगळं घडणार आहे अँग्री बर्ड्स स्पेस या अँग्री बर्ड्सच्या नव्या व्हर्जनमध्ये...
अँग्री बर्ड्स या खेळाचे निर्माते रोव्हिओ एंटरटेनमेंटने गुरुवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच अंग्री बर्ड्स आणि गुरूत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा संबंध जोडून बनवलेला अँग्री बर्ड्स खेळ लोकांसमोर आणला होता. या खेळासाठी नासाने मदत केली होती. शैक्षणिक माहिती साठी या खेळाचा उपयोग झाला होता.
“आता रेव्हिओ नासाचं मंगळावरील मिशनची माहिती अँग्री बर्ड्सच्या नव्या खेळातून लोकांना देणार आहे.” असं नासाच्या वॉशिंग्टन प्रमुखालयातून डेव्हिड विव्हर यांनी सांगितलं. ‘अशा प्रकारे मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांना तसंच प्रौढांना मंगळावरील मिशनची माहिती देण्याचा हा उपक्रम यशस्वी होईल’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
First Published: Saturday, August 25, 2012, 16:40