भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपलApple is now not selling iPhone 4 in Indian market

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल
www.24taas.com, झी मीडिया, जळगांव

अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं जगभरात आयफोनची सेलिंग प्राइस (एएसपी)मध्ये ४१ डॉलरनं कमी आल्यामुळं हा निर्णय घेतलाय. टेक गुरूंच्या मते आयफोन ४ रिलॉन्च आणि इमर्जिंग मार्केट्समध्ये आयफोन ४एसच्या किमतीतील कमी जबाबदार असल्याचं मानतात.

अॅपलचे तीन ट्रेड पार्टनर्संनी सांगितलं की देशात आयफोन ४चा सप्लाय गेल्या दोन आठवड्यांपासून थांबवलाय आणि अॅपलनं आपल्या ट्रेड पार्टनर्सचा या मॉडेलसाठी नवीन ऑर्डस न घेण्याचेही संकेत दिले आहेत. यासोबतच अॅपल आपली मार्जिन कायम ठेवण्यासाठी २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या सेगमेंटमधून बाहेर निघेल. एका ट्रेड पार्टनरनं सांगितलं की आयफोन ४ नं जे केल, ज्याची भारतात अॅपलची गरज होती. मागील एक वर्षात आयफोनचा कंज्युमर बेस दुप्पट होऊन २५ लाख लोकांना झालाय , जो कोणत्याही इतर ब्रँडवर जाणार नाही.

ब्राझील आणि चीन सोबतच भारतीय बाजारातही आयफोन ४ची प्रचंड मागणी आहे. भारतात सेल्स दुप्पट झालाय. रेटेलर्सचं म्हणणं आहे की सेल्समधील वाढ ही आयफोन ४ आणि आयफोन ४ एसची मोठी भूमिका आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 12:23


comments powered by Disqus