आज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C! Apple may launch iPhone 5S and iPhone 5C today

आज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C!

आज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C!
www.24taas.com , झी मीडिया, कॅलिफोर्निया

कॅलिफोर्नियामध्ये आज होणाऱ्या अॅपलच्या इव्हेंटमध्ये नवा आयफोन लाँच होणार आहे. आयफोन ५एस आणि आणि आयफोन ५सी हे अॅपलचे दोन फोन आज लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन ५सी हा आयफोनचा स्वस्त असा फोन असेल, असं सांगण्यात येतंय. मात्र तरीही दोन्ही फोनच्या किमतीत जास्त फरक नसेल,अशीही शक्यता वर्तविली जातेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅपल ५एसच्या प्रोसेसरमध्ये काही सुधारणा करण्यात आलीय. तसंच फोनच्या कंप्यूटिंग पॉवरसाठी ए-७ चीपही बदलण्यात येणार आहे. ८ ते १३ मेगापिक्सलपर्यंतचे कॅमेरे, अँगल लेन्स जास्त वाईड, आणि फ्लॅशमध्ये काही सुधारणा, असं या फोनचं स्वरुप असेल. शिवाय बॅटरीतही ८ ते १० टक्के जास्त एनर्जी असेल. आयओएस ७ ऑपरेटिंग स्टिस्टमसोबतच फिंगर प्रिंट स्कॅनरचीही सुविधा असेल. ज्यामुळं फोन लॉक आणि अनलॉक केलं जाईल.

आयफोन ५सी मध्ये अॅपलचं व्हॉईस असिस्टंट असणार नाही, सोबतच आयओएस ७ मधील अनेक फिचर्स आयफोन ५एस आणि आयफोन ५सीमधून गायब असतील. मात्र ‘आयफोन ५सी’ची किंमत खूप कमी असेल. तेव्हा बघूया आयफोनचं हे नवं व्हर्जन कसं असेल ते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 10, 2013, 15:08


comments powered by Disqus