अॅपलचे अपडेट सॉफ्टवेअर, apple`s new software

अॅपलचे सॉफ्टवेअर अपडेट

अॅपलचे सॉफ्टवेअर अपडेट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

`अॅपल iOS ७` हे नविन मोबाइल सॉफ्टवेअरचे बाजारात दाखल केलं आहे. नावीन्यतेच्या शोधात असलेल्या अॅपलने मोबाइल सॉफ्टवेअरचे नवीन रूप मोबाइल जगतात आणले आहे.

‘आयओएस ७’ला कंपनीने सोमवारी वर्ल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये सादर केले. ‘आयओएस ७’ हे अॅपलसाठी आतार्यंतचे सर्वात महत्त्वाचे उत्पादन असून यातून कंपनीची पुढची वाटचाल ठरणार आहे. मोबाइल सॉफ्टवेअरमध्ये ज्याप्रकारे अँड्राइडने मुसंडी मारली आहे तिला आव्हान देण्यासाठी अॅपलने‘आयओएस ७’हे विकसित केले आहे.

कंपनीचे प्रमुख डिजायनर सर जोनाथन आइव्ह यांनी आयओएस ७ ला विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष: पहिल्यांदा अॅपल कंपनीने ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल केला आहे. याआधी २००७ मध्ये कंपनीने आयफोनमधून ‘आयओएस’ बाजारात आणले होते.

आता आयओएस ७ मधील बदल कंपनीला कितपत तारतील याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ‘आयओएस ७’ हे अॅड्रॉइडशी मिळते-जुळते असल्याचे काही जाणकारांनी म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 16, 2013, 08:01


comments powered by Disqus