बजाजची ‘डिस्कवर १०० एम’ बाजारात... , Bajaj Auto Unveils Discover 100 M

बजाजची ‘डिस्कवर १०० एम’ बाजारात...

बजाजची ‘डिस्कवर १०० एम’ बाजारात...

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

दिवाळीचं औचित्य साधत बजाज कंपनीनं डिस्कवर श्रेणीतली ‘डिस्कवर १०० एम’ ही नवी बाईक बाजारात आणलीय. बजाज कंपनीच्या आकुर्डी इथल्या मुख्यालयात या बाईकचं अनावरण करण्यात आलं.

‘डिस्कव्हर १०० एम’ बाईकची दिल्लीमध्ये शो-रूम प्राईज आहे ४५,९९६ रुपये... ही बाईक लाल, निळा, मिडनाईट ब्लॅक(लाल), मिडनाईट ब्लॅक (निळा), मिडनाईट ब्लॅक (ऑलिव्ह) रंगात उपलब्ध आहे. या बाईकमध्ये डीटीएस टेक्नोलॉजी वापरण्यात आलीय.

११० सीसी बाईकच्या रेंजमध्ये ही बाईक जास्त फायदेशीर आणि अधिक क्षमतेची असल्याचा दावा करण्यात आलाय. ही बाईक ८४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देईल, असा दावा कंपनीनं केलाय.

‘डिस्कव्हर १०० एम’चे फिचर्स…
> फोर वेल्व्ह डीटीएस-आय इंजिन
> ८४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज
> ९.३ पॉवरचं इंजिन
> हाय पॉवर
> टॉप स्पीड – ९५ किलोमीटर प्रति तास
> इलेक्ट्रीक स्टार्ट
> गॅस फिल्ड निट्रॉक्स सस्पेन्शन
> किफायशीर बॅटरी
> पेटल डिस्क ब्रेक
> प्रिमियम अॅल्युमिनिअम साईड सिटस्

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 23:32


comments powered by Disqus