Last Updated: Tuesday, June 18, 2013, 08:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा येत्या काही दिवसांत ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही दिसणार आहे.
‘ब्लॅकबेरी मॅसेंजर’ ही सुविधा लवकरच ‘अॅन्ड्रॉईड’ (सॅमसंग, कार्बन, आयबॉल) आणि ‘आयओएस’मध्येही (अॅपल) उपलब्ध होणार असल्याची घोषणा ब्लॅकबेरीनं मे महिन्यातच केली होती. ब्लॅकबेरीच्या मॅसेंजर या सुविधेमुळे उपयोगकर्ते ब्लॅकबेरी मोबाईलच्या साहाय्यानं दुसऱ्या ब्लॅकबेरी उपयोगकर्त्याला टेक्स्ट मॅसेज, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो पाठवू शकतात. येत्या २७ जूनपासून ही सुविधा केवळ ब्लॅकबेरीच्याच नाही तर ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’ या ऑपरेटींग सिस्टमचा वापर करणाऱ्सा सर्व मोबाईलमध्ये वापरता येईल.
सध्या, बीबीएमप्रमाणे वी चॅट, निम्बूझ, व्हॉटस् अॅपसारखे अॅप्लिकेशन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे सगळे अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध आहेत. ब्लॅकबेरीनंही आपलं ‘बीबीएम’ अॅप्लिकेशन लॉन्चिंगच्यावेळी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 18, 2013, 08:14