Last Updated: Monday, February 25, 2013, 21:26
www.24taas.com, मुंबईब्लॅकबेरीने आपला बहुप्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन झेड १० सोमवारी भारतात लॉन्च केला. भारतात या फोनची किंमत ४३,४९० रुपये आहे. कंपनीने या फोनमध्ये आपल्या ब्लॅकबेरी -१० या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर केला आहे.
कॅनडाच्या या कंपनीने ब्लॅकबेरी १० या ऑपरेटिंग सिस्टिमला गेल्या महिन्यात जगातील बाजारपेठेत उतरवला होता. कंपनी या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत दोन फोन झेड १० आणि क्यू १० गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये बाजारात आणले होते.
नव्या फोनमध्ये १.५ गीगाहर्ट्जचे डुअल कोर प्रोसेसर आहे. तर याची २ जीबी रॅम मेमरी आहे. यात १६ जीबी रॅम मेमरीही आहे. ती ६४ पर्यंत वाढता येऊ शकते. यात ८ मेगापिक्सल आणि दोन मेगापिक्सल असे दोन कॅमेरे आहे.
कंपनीने अपल आणि अन्ड्रॉइड या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी हा फोन बाजारात आणला आहे.
First Published: Monday, February 25, 2013, 21:26