बोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल Bonsai tree charges mobile bateries

बोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल

बोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल
www.24taas.com, पॅरीस

फ्रान्सच्या एका डिझायनरने एक असं बोन्साय ट्री तयार केलं आहे, जे केवळ दिसायलाच शोभिवंत असेल असं नाही, तर सौर ऊर्जेचा वापर करून हे बोन्साय ट्री मोबाइल आणि इतर विद्युत उपकरणंही चार्ज करू शकेल.

द इलेक्ट्रिक प्लस नामक या बोन्साय ट्रीला डिझायनर विवियन मुलर याने तयार केलं आहे. या झाडामध्ये २७ सिलिकॉन पॅनेल्स लागले असून ते झाडाच्या पानांसारखेच दिसतात. बोन्साय वापरणारी व्यक्ती आपल्याला हवं तसं झाड सजवू शकते.

डिझायनर यासंबंधात म्हणाला की खरं बोन्साय ट्री पाहूनच मला ही संकल्पना सुचली. झाडांची पानं सौर ऊर्जेचा वापर करूनच झाडाचं पोषण करत असतात. तसंच आपण बनवलेल्या बोन्साय ट्रीच्या बॅटरीज सौर शक्तीचा साठा करून मोबाइल, आयपॅड आणि इतर काही विद्युत उपकरणांना चार्ज करू शकतात.

First Published: Sunday, December 2, 2012, 18:07


comments powered by Disqus