Last Updated: Thursday, January 16, 2014, 17:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं चॅम्पियन कंपनीसोबत मिळून दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणलेत. शहरांवर लक्ष केंद्रीत करून कंपनीनं हे स्मार्टफोन लॉन्च केलेत.
कंपनीनं चॅम्पियन सीरीजमध्ये ‘माय फोन एसएम ३५१२’ आणि ‘माय फोन एसएम ३५१३’ हे थ्रीजी सपोर्टीव्ह स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवले आहेत. हे दोन्हीही फोन ड्युएल कोर प्रोसेसर आणि ड्युएल सिमकार्ड धारक आहेत. दोन्हीही मोबाईलचे फीचर्स जवळजवळ सारखेच आहेत...
‘माय फोन एसएम ३५१२’ आणि ‘माय फोन एसएम ३५१३’ची वैशिष्ट्यं... - स्क्रीन ३.५ इंच
- ३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- १.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- एफएम रेडिओ आणि मेमरी ३२ जीबी
- १,३३० mah बॅटरी
- अँड्रॉईड ४.२.२ जेलिबिन
या दोन्ही फोनची किंमत अनुक्रमे ३२२५ आणि ४४९९ रुपये आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 16, 2014, 17:31