BSNLनं लॉन्च केलं सर्वात स्वस्त फॅबलेट!BSNL launch very cheap price Tablet

BSNLनं लॉन्च केलं सर्वात स्वस्त फॅबलेट!

BSNLनं लॉन्च केलं सर्वात स्वस्त फॅबलेट!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारत संचार निगम लिमिटेडनं नुकताच चॅम्पॅरियन मोबाईल्ससोबत मिळून एक नवा फॅबलेट लॉन्च केलाय. विशेष म्हणजे या फॅबलेटची किंमत फक्त ६,९९९ रुपये आहे. `चॅम्पियन DM६५१३` असं या फॅबलेटचं नाव आहे.

ड्युअल कोअर असलेल्या या फॅबलेटची स्क्रीन ६.५ इंच इतकी आहे. तर याचा चिपसेट १.३ जीएचझेड ड्युअल कोअर आहे. यात ५ मेगापिक्सल कॅमेरा बॅक साडईडा आहे. तर २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. यात अँड्रॉईड ४.२ वर आधारित सिस्टीम आहे.

फॅबलेटचा रॅम ५१२ एमबी आहे. यात ४ जीबीचं इंटर्नल स्टोरेज आहे. सोबतच यात मायक्रो एसडी कार्ड सपोर्टही आहे. यात ३जी, वाय-फाय. जीपीएस आणि ब्लूटूथ सारखे फिचर्सही उपलब्ध आहेत. शिवाय एफएम रेडिओ.
फॅबलेटची बॅटरी ३५०० एएमएचची आहे, जी खूप शक्तिशाली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 16:21


comments powered by Disqus