रुपयाच्या घसरणीचा परिणाम कॅमेऱ्याच्या किंमतीवर! Canon hikes DSLR camera prices

रुपयाच्या घसरणीचा परिणाम कॅमेऱ्याच्या किंमतीवर!

रुपयाच्या घसरणीचा परिणाम कॅमेऱ्याच्या किंमतीवर!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

भारतातल्या रुपयाच्या अवमूल्यनाचा परिणाम आता इलेक्ट्रानिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही होतोय. इलेक्ट्रानिक्स उपकरणं बनवणाऱ्या कॅनन कंपनीनं आपल्या कॅमेऱ्यांची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला.

रुपयाच्या अवमूल्यनानं व्यवसायावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि नुकसान भरून काढण्यासाठी उत्पादनांची किंमत वाढवण्याची तयारी कंपनीनं केलीय. गेल्या आठवड्यातच त्यांनी डीएसएलआर कॅमेऱ्याची किमतीत वाढ केली. तसंच येत्या ऑक्टोबर महिन्यात ग्राहक आणि बी२बी उत्पादन विभागांनामध्येही ५ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचं, कॅनन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आलोक भारद्वाज यांनी सांगितलं. रुपयाच्या घसरणीमुळं आमच्या मार्जिनवर खूप दबाव पडतोय. काही नुकसान आम्ही सहन केलं, तर काही भाग आता ग्राहकांना सहन करावा लागेल, असंही भारद्वाज म्हणाले.

गेल्या आठवड्यात डीएसएलआर कॅमेऱ्याच्या किमतीत सहा टक्क्यांनी वाढ केल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं. मागील तीन महिन्यात रुपया २० टक्क्यांनी घसरलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यात २५ टक्क्यांनी अवनती आलीय. भारतात कॅननचा डीएसएलआर कॅमेरा २९ हजारांपासून ४.५५ लाखांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 10:52


comments powered by Disqus